Header

Eknath Khadse | …तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर हे वक्तव्य दुर्दैवी’

Eknath Khadse | …तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर हे वक्तव्य दुर्दैवी’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Eknath Khadse | पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. मोदींना घराणेशाही संपवायचेय मी सुद्धा त्याचे प्रतिक, पण मोदींनीही मला संपवायचे ठरवले तर संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी केले होते, या वक्तव्यानंतर मोठी चर्चा सुरू आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचे नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतले, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे.

 

खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले की, मला वाटते त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचे नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत.

 

दरम्यान, बीड येथे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात.
ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू.
जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे.
मी देखील वंशवादाचे प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही.
मी जनतेच्या मनावर राज्य केले, तर मोदींनीही मला संपवायचे ठरवले तरी ते संपवू शकत नाहीत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse reaction on pankaja munde statement about pm narendra modi Marathi News

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुलाच्या ऑपरेशनचा बहाणा करुन पैसे घेऊन केली फसवणूक; वडिल मुलीवर गुन्हा दाखल, मृत्यु पावलेल्या पतीच्या केल्या खोट्या सह्या

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

 

The post Eknath Khadse | …तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर हे वक्तव्य दुर्दैवी’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article