Header

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा

चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी चंद्रपुरमध्ये (Chandrapur) एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी चंद्रपुरात 20 टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी (Petroleum Refinery) स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर (Chandrapur Lok Sabha Constituency) लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरी (Hardeep Singh Puri) यांची पक्षाकडून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चंद्रपूरमध्ये भाजपच्या (BJP) वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हरदीपसिंग पुरी  यांनी पेट्रोलियम खात्याने 252 पासून 400 मिलियन मेट्रिक टन वार्षिक रिफायनिंग क्षमता
वाढविल्याची माहिती दिली. मागच्या सरकारने रत्नागिरी (Ratnagiri) येथील प्रकल्प रखडवले.
मात्र, आता 20 टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू असे आश्वासन पुरी यांच्याकडून देण्यात आले.

 

मागील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) राजकीय स्थिती अनुकूल असतानादेखील भाजपने चंद्रपूरची जागा गमावली होती.
यामुळे भाजपच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री पुरी तीन दिवस चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रात मुक्कामी आहेत.
राज्यात लोकसभेच्या भाजपने गमावलेल्या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी पक्षाकडून लोकसभा प्रवास अभियान (Loksabha Pravas Abhiyan) सुरु करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Hardeep Singh Puri | a petroleum refinery will be established in chandrapur announcement by union petroleum minister hardeep singh puri

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | उधारीचे पैसे मागितल्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

Mumbai-Goa Highway | अंजनारी पुलावरून गॅस टँकर कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

 

The post Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article