Header

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (Maharashtra Municipal Election) मनसे आणि भाजप (MNS-BJP Alliance) एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत आहे. भाजप नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने त्यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याने युतीची लवकरच घोषणा होईल अशी शक्यता होती. मात्र, या दरम्यान मनसेचे सरचिटणीस (MNS General Secretary) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सूचक विधान केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्याच्या (Maharashtra Municipal Election) तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती देशपांडे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मनसेच्या बैठकीबाबत संदीप देशपांडे यांना विचारण्यात आलं. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिंदे गटासोबत युती करणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. यामध्ये काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नाही. शिंदे गटासोबत (Shinde Group) युती करण्याबाबतच्या बातम्या आम्ही पाहात आहोत. पण राज ठाकरेंच्या आदेशानुसार मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), संभाजीनगर (Sambhajinagar) किंवा इतर महापालिकांच्या (Maharashtra Municipal Election) ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व जाग लढवण्याची तयारी करत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

 

कोणासबोत युती करणार असे विचारले असता, सध्या राज ठाकरे यांनी सर्व जागा लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहत.
आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजप (BJP) घेत नाही.
राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जागा लढवण्याची तयारी सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष करत असल्याचे
देशपांडे यांनी सांगितले.

 

संदीप देशपांडे पुढे म्हणाले, यापूर्वी 200 ते 227 दरम्यान जागा लढवल्या होत्या.
2006, 2012, 2017 मध्ये आम्ही सर्व ताकदीने सर्व जागा लढवल्या होत्या.
त्याचप्रमाणे यावेळीही 227 जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहोत. तशी तयारी सुरु असून राज ठाकरेंकडून वेळोवेळी आदेश येत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Municipal Election | mns sandeep deshpande sandip deshpande maharashtra navnirman sena bjp

 

हे देखील वाचा :

Vedanta Foxconn Project | पुण्याची जागा योग्य असल्याचे अहवालात नमूद असतानाही प्रकल्प गुजरातला गेला; Foxconn Project चा अहवाल फुटला

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता द्या, मुख्यमंत्र्यांचं रेल्वेमंत्र्यांकडे साकड

 

The post Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article