Header

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेचा (Hindu Rashtra Sena) पदाधिकारी व मोक्कातील आरोपी तुषार हंबीर (Tushar Hambir) याच्यावर ३ ते ४ जणांनी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) घुसून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसाने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ससून रुग्णालयात सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडली. थेट ससून रुग्णालयात कैद्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

२०१२ साली हडपसर परिसरात झालेल्या दंगलीत मोहसिन शेख (Mohsin Sheikh) याचा खून (Murder) करण्यात आला होता. हडपसर, काळेपडळ (Kalepadal, Hadapsar) भागात हंबीर याची दहशत आहे. त्यातूनच तुषार हंबीर याच्यावर मोक्का (MCOCA) खाली कारवाई करण्यात आली आहे.

 

 

हंबीर याच्यावर यापूर्वीही येरवडा कारागृहात (Yerwada Jail) हल्ला झाला होता. सध्या तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला २५ ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Pune Crime)

 

 

सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जण हातात कोयते घेऊन कैद्यांच्या वॉर्डमध्ये आले.
त्यांनी हंबीर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तेथे बंदोबस्तावर असलेला पोलीस कर्मचारी सावध होता.
त्यामुळे त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यामुळे हंबीर हल्ल्यातून वाचला.

 

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील (Deputy Commissioner of Police Sagar Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांना शोध घेतला जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title: Pune Crime | Attack on Hindu Rashtra Sena’s Tushar Hambir at Sassoon Hospital; Police personnel injured

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | आनंदननगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची माहिती घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

Gulabrao Patil | मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वादग्रस्त सल्ला; म्हणाले – ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा’

 

The post Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article