Header

Uddhav Thackeray | विजय आपलाच होणार, कितीही अफजल खान आले तरी…, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Uddhav Thackeray | विजय आपलाच होणार, कितीही अफजल खान आले तरी…, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, मुद्यांवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पाच सदस्यीय घटनापीठाकडे (Constitution Bench) सुनावणी सुरु आहे. त्यात आता शिवसेना पक्ष प्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) हल्ला केला आहे. मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान (Afzal Khan) आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यावर टीका केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

उस्मानाबादहून (Osmanabad) आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर (Matoshree) नेऊन शिवबंधन बांधलं. दसरा मेळावा (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कच्या मैदानावर (Shivaji Park) घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ठाकरे यांच्या बाजूने दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात सध्या सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात चिंता आणि धाकधूक आहे.

 

आताचं जे वातावरण आहे ते भारावून टाकणारे आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस न्यायालयात सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे, तुळजाभवानीच्या (Tuljabhawani) दर्शनाला मी येणारच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे कारण कैलासने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ओमराजे (Omprakash Rajenimbalkar) देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितलंय, तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते. जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे, परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले, मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाही,
ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत.
जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता, दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मेळावा
इथेच झाला असता, मला फोन येत आहेत कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही, भवानी मातेची कृपा आहे,
ती कृपा नाही तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिलंय.
शिवाजी महाराजांना भवानी मातेची तशी तलवार दिली तशी श्रद्धा आहे.
तसंच तुमच्याकडे बघून असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे,
अशा भावना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | maharashtra political crisis supreme court shivsena vs eknath shinde latest update uddhav thackeray first reaction

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | मुंबई पोलिसांचा दाऊद इब्राहिमला दणका, गँगस्टर रियाझ भाटीला अटक

Early Death Sign | शरीरात दिसली ही लक्षणे तर होऊ शकतो अकाली मृत्यू, स्टडीमध्ये झाला खुलासा

CM Eknath Shinde | थापा पैशाने विकला जाणारा माणूस नाही, तो निष्ठावंत; मुख्यमंत्री शिंदेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर

Raw Food Side Effects | ‘हे’ 5 हेल्दी फूड्स चुकूनही कच्चे खाऊ नका, होऊ शकते गंभीर नुकसान!

 

The post Uddhav Thackeray | विजय आपलाच होणार, कितीही अफजल खान आले तरी…, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article