Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भाऊबीज आणि पाडव्याच्यावेळी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने एका भेटींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुढील मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व्हावेत, असे मला वाटत असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लावला आहे. चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) त्यांच्या इच्छेची खिल्ली उडवली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2024 पर्यंत शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) एकत्र राहणार का, असा प्रश्न पाटलांनी विचारला. तुमच्या पक्षातील लोक तरी तुमच्यात राहातील का? असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. अजित पवारांना 2024 साली मुख्यमंत्री करण्यासाठी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) बहुमत आणावे लागेल. त्यासाठी महाविकास आघाडी एकत्र राहायला हवी. त्यांच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्ये त्यांच्यासोबत राहायला हवेत. आणि याचा अभ्यास त्यांना करावा लागेल, आणि त्यासाठी वेळ लागतो, असे पाटील म्हणाले.
पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी देखील पुढील मुंख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल, असे म्हटले होते. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण, हा मुद्दा वर आला होता.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली.
देशात महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले कारण, ते तळागाळातील लोकांपर्यत पोहोचले.
त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासोबत संवाद साधला.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना हे सर्व उशिरा कळाले.
यांना बराच काळ असे वाटत होते की, मातोश्रीवर बसून लोकांची दु:ख कळतात.
आता त्यांना साक्षात्कार झाला. त्यांनी आता जे दौरे सुरु केले आहेत, ते उशिरा सुरु केले आहेत.
त्यांनी अडीच वर्षे हे दौरे केले पाहिजे होते पण, त्यांनी त्यावेळी केले नाही.
आता ते दौरे करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असे पाटील म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil targets rohit pawar
हे देखील वाचा :
The post Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली appeared first on बहुजननामा.