Header

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आयपीएस रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने त्यांच्यावर खटला चालविण्यास परवानगी नाकारली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि शुक्ला यांच्या विरोधातील तक्रारदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फोनचे टॅपिंग ज्या कालावधीत झाले, त्यावेळी राज्यात निवडणुका (Elections) होत्या. त्यामुळे हे संभाषण कोणाला तरी पुरविण्यात आले होते. यामागे कोणाचा हेतू होता, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहिली आहेत. ही उत्तरे जनतेपर्यंत पोहोचायला हवी. रश्मी शुक्ला यांनी निवडणुकीच्या कालावधीत 68 दिवस माझा फोन टॅप केला होता. त्यावेळी शुक्ला संबंधित विभागाच्या अधिकारी होत्या. माझा फोन का टॅप करण्यात आला, त्यातून नेमके काय साध्य केले, फोन टॅपिंग कोणाच्या सुचनेनुसार करण्यात आले, कोणाला त्याचा फायदा झाला, असे अनेक प्रश्न आज अनुत्तरीत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.

 

तसेच अलीकडच्या काळात रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) भेटल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची देखील भेट घेतली होती. त्याचवेळी मला संशय आला होता. त्यांना क्लिनचिट मिळणार, अशी मला खात्री होती आणि तसेच घडले, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांवर आरोप केले.

 

अवैध फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस स्थानकात (Colaba Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut),
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
(Nana Patole) यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Eknath Khadse | eknath khadse reaction on rashmi shukla get relief in phone tappting case

 

हे देखील वाचा :

Maha Vikas Aghadi | CBI चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगीची आवश्यकता नाही, महाविकास आघाडीला राज्य सरकारचा मोठा दणका

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा

 

The post Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article