Header

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Legends League | क्रिकेटच्या (Cricket) मैदानात अनेकदा आपण खेळाडूंमध्ये वाद होताना पाहिले आहेत. हे अनेकदा लाईव्ह सामन्यादरम्यानसुद्धा (Live Match) घडते. सध्या लीजेंडस लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) अशीच एक घटना घडली आहे. हि लीग क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये खेळवण्यात येते. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान रिटायर झालेले दोन प्रसिद्ध क्रिकेटपटू एकमेकांबरोबर भिडताना दिसले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

या दोन खेळाडूंचा वाद एवढा वाढला कि त्यांच्यात फक्त हाणामारी होणे बाकी राहिले होते. लाइव्ह मॅचमध्ये मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) आणि युसूफ पठानमध्ये (Yusuf Pathan) वाद झाला.ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन क्रिकेट खेळताना मैदानावर नेहमीच आक्रमक असायचा. रिटायरमेंटनंतरही त्याच्या वर्तनात बदल झालेला नाही.

 

लीजेंडस लीगच्या (Legends League) सामन्यात ही घटना घडली. या दोन खेळाडूंमधील वाद एवढा वाढला कि अन्य खेळाडू आणि अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली.
भीलवाडा किंग्स (Bhilwara Kings) आणि इंडिया कॅपिटल्समध्ये (India Capitals) लीजेंड्स लीगच्या क्वालिफायरचा सामना सुरु होता.
युसूफ पठान फलंदाजी करत असताना मिचेल जॉन्सन त्याला काहीतरी बोलला.
त्यावर युसूफ पठानने त्याला प्रत्युत्तर दिलं. यानंतर शाब्दिक चकमक वाढत गेली.
यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जॉन्सनने पठानला धक्कासुद्धा मारला.
याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Legends League | legends league cricket 2022 mitchell johnson pushes yusuf pathan away watch video

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | गोव्यातून दारुची एक बाटली आणली तरी…, शिंदे सरकारचा आदेश, राज्यातील मद्यविक्रेत्यांना दिलासा, महसुलही वाढणार

Andheri East by Election | शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाची पहिली परीक्षा, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Girish Mahajan | एकनाथ खडसेंच्या BJP प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले – मी, फडणवीस, खडसे एकत्र…

 

The post Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article