Header

Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा पडली भारी; कंपनीच्या सीईओना ट्राफिकचा फटका

Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा पडली भारी; कंपनीच्या सीईओना ट्राफिकचा फटका

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | मर्सिडीज बेन्झ म्हटलं तर भल्याभल्यांची नजर गाडीवर खिळून राहते. मात्र, तब्बल पावणे दोन कोटींच्या मर्सिडीज बेंझला एका रिक्षाने फिके पाडले आहे. वाहतूक कोंडीमुळे जगप्रसिद्ध मर्सिडीज बेंन्झ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला तब्बल तीन तास मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी थेट रिक्षा प्रवास केला त्यांनी सोशल मीडियावर पुण्यातील ट्राफिक बाबत आपला अनुभव शेयर करीत रिक्षा चालकाचा फोटो पोस्ट केला आहे. (Mercedes Benz CEO Auto Ride In Pune)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या  सीईओंना शुक्रवारी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यांनी आलीशान मोटार रस्त्यावरच सोडून देऊन  चक्क रिक्षाने प्रवास केला.

 

वाहतूक कोंडीमुळे सीईओ मार्टिन श्वेंक यांनी त्यांची १ कोटी ६० लाखांच्या एस क्लास आलीशान मोटार रस्त्यावरच सोडून काही अंतर चालत प्रवास केला. त्यानंतर चक्क थेट रिक्षात बसून वाहतूक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. मार्टिन श्वेंक यांनी आज अनुभवलेला सर्व प्रकार इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. रिक्षातून प्रवास करतांनाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी  पुणेरी भाषेत सल्ले दिले आहेत. श्वेंक हे चाकणहून पुण्याला येत होते. त्यावेळी त्यांना वाहतूककोंडीचा अनुभव आला. त्यानी आलीशान गाडी रस्त्यात सोडून देऊन प्रवास केला. रिक्षा प्रवास कसा वाटला यासंदर्भात अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत.

 

मार्टिन श्वेंक यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, जर तुम्ही मर्सडिजच्या एस क्लास
या गाडीतून प्रवास करत असाल आणि तुमची ही गाडी पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये भर रस्त्यात अडकून पडली तर
तुम्ही काय कराल? कदाचित कारमधून उतरुन चालायला सुरुवात कराल.
काही किलोमीटर गेल्यानंतर रिक्षा पकडाल? ही फोटोओळ लिहीत त्यांनी त्यांच्या रिक्षातील प्रवासाचा  फोटो पोस्ट केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नेटकाऱ्याने त्याना रिक्षा ऐवजी गाडीतच बसून राहिलो असतो.
गाडीत बसून मी चक्क वडापाव मागितला असता आणि त्याच्या आनंद घेतला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Web Title :- Mercedes Benz CEO Auto Ride In Pune |mercedes benz ceo auto ride in pune after s class gets stuck in pune traffic

 

हे देखील वाचा :

Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Chandrasekhar Bawankule | एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ गद्दारीचा बदला घेतला, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray | महंत सुनिल महाराजांना शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांना टोला, गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही

 

The post Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा पडली भारी; कंपनीच्या सीईओना ट्राफिकचा फटका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article