Header

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचे प्रत्युत्तर, आजोबांकडून ट्यूशन घेण्याचा दिला सल्ला (व्हिडिओ)

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचे प्रत्युत्तर, आजोबांकडून ट्यूशन घेण्याचा दिला सल्ला (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी गौप्यस्फोट केला होता की, शिवसेना फोडल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबाला फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपाचे आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

प्रसाद लाड यांनी म्हटले की, रोहित पवारांना (NCP MLA Rohit Pawar) काय बोलायचे आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहिले पाहिजे. भाजपची ही संस्कृती नाही. भाजपने कधीच अशाप्रकारे उद्योग केलेले नाहीत. रोहित पवारांचा ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’, अशाप्रकारचे वक्तव्य आहे.

 

लाड पुढे म्हणाले की, त्यांना कुणाबद्दल बोलायचे आहे, घरातल्या कोणत्या व्यक्तीबद्दल बोलायचे आहे, हे त्यांनी ठरवले पाहिजे. आपले वय किती आहे आणि आपण किती बोलतो आहोत, याबद्दल रोहित पवारांनी विचार करावा. आजोबांकडून त्यांनी ट्यूशन घेतली पाहिजे.

 

दरम्यान, रोहित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करताना भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले की, कोणामध्येही फूट पाडण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्यांनी त्यांचे घर सांभाळावे, हा त्यांचा अंतर्गत कलह असेल. भविष्यात काही घडणार असेल आणि त्याची चाहूल लागल्याने ते आता आमच्यावर खापर फोडत असतील.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

तर रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर सारवासारव करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,
काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असे बोलूच शकत नाही.
तसे काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो.
रोहितशी बोलावे लागेल, त्याने नेमके कशामुळे हे वक्तव्य केले ते पाहावे लागेल.
अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर स्वता रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देताना
म्हटले की, फोडाफोडीचे राजकारण होत आहे. शिवसेना (Shivsena) हा मोठा पक्ष फोडण्यात आला.
एक मोठा पक्ष फोडल्यानंतर फोडाफोडीचेच राजकारण करायचे असेल, तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे.
एक मोठा पक्ष फोडल्यानंतर पुढील टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकते, असे मी बोलता बोलता म्हणालो.
मी भाजपा म्हणालो नव्हतो, तर विरोधात असलेल्या पक्षाचे, असे मी म्हणालो होतो.

 

 

Web Title :- NCP MLA Rohit Pawar | take tuition from grandfather bjp mla prasad lad criticizes rohit pawar on pawar family split

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे शिंदे गटाला उघडे पाडणारे वक्तव्य, म्हणाले – ‘अपने को क्या करना है तीर-कमान से, बालासाहाब से, अपना…’

Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव

Nitesh Rane | भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नितेश राणे म्हणाले- ‘….तर अशी प्रतिक्रिया मिळणारच’

 

The post NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचे प्रत्युत्तर, आजोबांकडून ट्यूशन घेण्याचा दिला सल्ला (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article