Header

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी (Sweet Shop) मागवलेला 5 लाख 90 हजार 400 रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा (Gujarat Barfi) साठा जप्त (Pune Crime) केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. 17) रोजी अशोक राजाराम चौधरी (Ashok Rajaram Chaudhary) यांच्या वाहनातून गुजरात बर्फी – स्वीट हलवा Gujarat Barfi – Sweet Halwa (व्हानवटी-Vanvati), रिच स्वीट डिलाईट Rich Sweet Delight (ब्रिजवासी-Brijwasi ), स्वीट हलवा (ब्रिजवासी), स्वीट हलवा (पारस -Paras), स्पेशल बर्फी व स्वीट हलवा या अन्न पदार्थाचे 6 नमुने तपासणीसाठी घेवून हा साठा जप्त केला.

 

हा गुजरात बर्फी अन्न पदार्थ पुणे शहरातील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, बुधवार पेठ, मंडई
(Aggarwal Sweet Mart, Budhwar Peth), मे. कृष्णा डेअरी फार्म (Krishna Dairy Farm), मानसरोवर ॲनेक्स, कोंढवा बु., मे. अशोक राजाराम चौधरी, गहुंजे, देहूरोड व हिरसिंग रामसिंग पुरोहित
(Hirsing Ram Singh Purohit), बालेवाडी यांनी गुजरात व वसई (जि. पालघर) येथून मागविला असल्याचे आढळून आले.
या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून
त्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

 

अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत
असून या अंतर्गत १ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत मिठाईचे २८, खवा-२, रवा, मैदा, बेसन- १२,
खाद्यतेल- ७, वनस्पती/घी- २, नमकीन- ३ व इतर अन्न पदार्थाचे १६ असे एकूण ७० अन्न नमुने विश्लेषणासाठी
घेतले आहेत. तसेच खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्याचा पुनर्वापर केल्याचे आढळून आल्याने तीन ठिकाणी ४ लाख
५१ हजार ४०० रुपये किंमतीचा साठा, हिरवा वाटाणा- ३९ हजार ८०० रुपये, मिठाई- ६ हजार ७५० रुपये आणि घी /
खवा १२ हजार ४०० रुपये असा एकूण ५ लाख १० हजार ४०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई
बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या
खव्याचा वापर करावा. स्वीट खवा(गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई
विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे
(Joint Commissioner Sanjay Naragude) यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | barfi stock worth rs 5 lakh 90 thousand seized action by the department of food and drug administration

 

हे देखील वाचा :

Vaibhav Khedekar | मनसेच्या वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार

Sharad Pawar | पवार-शिंदेंची सोयरीक सांगत शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले- ‘मुलीसाठी जावयाच्या सूचना ऐकाव्याच लागतील’

Hingoli News | नोटीस पाहण्यासाठी लाचेची मागणी, शेतकऱ्याच्या लेकानं इंग्रजीत काढली खरडपट्टी

 

The post Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article