Header

Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भांडारकर रोडवर (Bhandarkar Road) प्रवाशांची वाट पहात थांबलेल्या रिक्षाचालकाला पौडला जायचे असल्याचा बहाणा करुन दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन व अंगठी जबरदस्तीने लुटून नेली. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी बाळासाहेब तुकाराम चव्हाण Balasaheb Tukaram Chavan (वय ७४, रा. सोमवार पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४६/२२) दिली आहे. ही घटना भांडारकर रोडवरील टीव्हीएस शोरुमच्या समोर ते पौड दरम्यान सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे रिक्षा घेऊन भांडारकर रोडवर प्रवाशांची वाट पहात होते.
त्यावेळी एक जण पौडला जायचे आहे, असे म्हणून रिक्षामध्ये बसला.
रिक्षा पौडकडे जात असताना काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन एक जण आला. त्या दोघांनी मिळून चव्हाण यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅमची सोन्याची साखळी व सोन्याची अंगठी असा ८० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A rickshaw puller was robbed at gunpoint on Bhandarkar Road

 

हे देखील वाचा :

IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार? पोलीस नेतृत्व बदलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं….

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्लांना मिळणार हे मोठं ‘गिफ्ट’?

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांकडून पिस्तुल, रॉड जप्त

Hindustan Unilever (HUL) | ‘हे’ शॅम्पू वापरणे ताबडतोब बंद करा, कॅन्सरचा धोका असल्याने कंपन्याने उत्पादने घेतली मागे

 

The post Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article