Header

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीने एका महिलेला बेदम मारहाण केल्याच्या वृत्ताचा व्हिडिओ मनसेच्या (MNS) सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी ट्विट केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Commission for Women Chairperson Rupali Chakankar) यांना सवाल केला आहे. तसेच महिलांवरील अन्यायाच्या बाबतीत चाकणकर (Rupali Chakankar) भेदभाव करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. स्वताच्या पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला मारहाण केल्याने आता त्या शांत बसल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

रायगड जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेच्या वृत्ताचा व्हिडिओ शालिनी ठाकरेंनी ट्विट केला आहे. या व्हिडीओत रायगडच्या तळा नगरपंचायतीच्या (Tala Nagar Panchayat) राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीने एका निवृत्त महिला ग्रंथपालाला शिल्लक राहिलेला पगार मागितल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे वृत्त दाखवण्यात आले आहे. अस्मिता बोरावकर (Asmita Borawkar) असे या महिला नगराध्यक्षांचे नाव असून प्रत्यक्ष मारहाणीचीही दृश्ये या व्हिडीओत आहेत.

 

यावरून शालिनी ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना सवाल केला आहे
की, मनसेच्या पदाधिकार्‍याने महिलेला मारहाण केली तर महिला आयोग स्वत:हून पुढाकार घेत पोलीस अहवाल मागवते.
मग आज त्याच आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केली,
तर आता गप्प का? दुसर्‍याचे ते कारटं आणि आपला तो बाब्या हा न्याय बरा नव्हे!, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Rupali Chakankar | raj thackeray wife shalini mns leader slams ncp

 

हे देखील वाचा :

Bhaskar Jadhav | 100 रुपयांच्या शिधावरुन भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा

Gulabrao Patil | भोसरी भूखंड प्रकरणावर गुलाबराव पाटलांनी खडसेंना डिवचलं, म्हणाले-‘… म्हणून हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले’

 

The post Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article