Header

T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या ऑस्ट्रेलियात T-20 वर्ल्डकप (T20 World Cup 2022) खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानबरोबर (Pakistan) होणार आहे. यादरम्यान BCCI अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी (Roger Binney) यांची BCCI अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी त्यांनी खेळाडूंना वारंवार दुखापती होण्याच्या समस्येचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले की, विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) 10 दिवस आधी जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) झालेल्या दुखापतीकडे, आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तीन दिवस आधी बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून (T20 World Cup 2022) बाहेर पडला. नेमके त्याचवेळी भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) कोविड-19 ची लागण झाली. त्यामुळे बुमराहच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यासाठी बीसीसीआयला (BCCI) शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली होती. या सगळ्यावरून रॉजर बिन्नी यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

 

काय म्हणाले रॉजर बिन्नी?
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (Karnataka State Cricket Association) सत्कार समारंभात बिन्नी म्हणाले, ”खेळाडूंना इतक्या वाईट रीतीने दुखापत का होत आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे.
आताच नाही तर गेली चार-पाच वर्षे हे सत्र सुरु आहे.”तसेच “आमच्याकडे चांगला प्रशिक्षक किंवा ट्रेनर नाही असे नाही.
खेळाडूंवर खूप ओझे आहे की ते खूप फॉरमॅट खेळत आहेत. यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.
याला माझे प्रथम प्राधान्य आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

 

याचबरोबर रणजी ट्रॉफीसारख्या (Ranji Trophy) देशांतर्गत स्पर्धांसाठी चांगल्या खेळपट्टया तयार करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.
तसेच सध्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल नाहीत. आम्हाला पायाभूत सुविधांवरही काम करावे लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- T20 World Cup 2022 | cant have a jasprit bumrah breaking down 10 days before world cup bcci president roger binny

 

हे देखील वाचा :

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

 

The post T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article