Header

Anil Bonde | संजय राऊतांना उशिरा सुचलेले शहाणपण, अनिल बोंडेंचा खोचक टोला

Anil Bonde | संजय राऊतांना उशिरा सुचलेले शहाणपण, अनिल बोंडेंचा खोचक टोला

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यावर भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी त्यांच्यावर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची केलेली स्तुती हे त्यांना उशिरा सुचलेले शाहणपण आहे, असे अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांचे काम महाराष्ट्रातील जनतेला आवडते. महाराष्ट्रातील जनता सतत त्यांच्या कामाचे कौतुकच करत आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना उशिरा का होईना देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा आढावा घ्यावा लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे संजय राऊत कौतुक आणि स्तुती करत असतील, तर चांगलेच आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी काम करत असतात. हे सर्वक्षुत आहे, असे देखील यावेळी अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

देवेंद्र फडणवीसच राज्यातील महत्वाचे निर्णय घेतात.
त्यामुळे मी त्यांच्या चांगल्या निर्णयांचे स्वागतच करतो. देवेंद्र फडणवीस अनुभवी आहेत. ते घेत असेलेले निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत.
त्यामुळे मी त्यांची देखील भेट घेणार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची विशेष न्यायालयाने गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणातून जामीनावर सुटका केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

 

Web Title :- Anil Bonde | Sanjay Raut’s belated wisdom, Anil Bonde’s khochak tola

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्याजवळील चाकण येथील ‘या’ किल्ल्यावरील हटवले अतिक्रमण

Gulabrao Patil | मी एका महिन्यात तीन वेळा जिल्ह्यात येणारा पालकमंत्री आहे, बाकीचे सहा सहा महिने येत नाहीत – गुलाबराव पाटील

Hostel Daze | दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या शेवटच्या सीरिजचा ट्रेलर रिलीज

Ajit Pawar | “काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या… “; अजित पवारांचे स्पष्टीकरण

 

The post Anil Bonde | संजय राऊतांना उशिरा सुचलेले शहाणपण, अनिल बोंडेंचा खोचक टोला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article