Header

Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

देवळी/वर्धा : बहुजननामा ऑनलाईन  – देवळी-वर्धा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात (Deoli-Wardha Road Accident) भंडारा येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा (Retired Police Officer) मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. देवळी-वर्धा रोडवर दोन ट्रक आणि कारचा अपघात (Deoli-Wardha Road Accident) झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनावर समोरुन येणाऱ्या दोन चारचाकी धडकल्याने हा भीषण अपघात झाला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हा अपघात देवळी-वर्धा मार्गावर (Deoli-Wardha Road Accident) बुधवारी (दि.9) सकाळी 11 च्या सुमारास शेतकी शाळेजवळ झाला. सुधाकर चव्हाण Sudhakar Chavan (रा. भंडारा) असे मृत्यू (Death) झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मालवाहू ट्रकचालक अंकुश केने आणि 16 चाकी चालक रामेश्वर (रा. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू मिनी ट्रकचा चालक अंकुश केने वाहन निष्काळजीपणे चालवत विरुद्ध दिशेने देवळीकडे जात होता. त्याचवेळी देवळीकडून वर्ध्याकडे येणारा 16 चाकी मालवाहू ट्रक आणि कार या दोन्ही गाड्यांसमोर मिनी मालवाहू ट्रक आल्याने दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन मिनी ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळल्या.

 

या भीषण अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे (Sawangi Police Station)
पोलीस निरीक्षक धनाजी जळक (Police Inspector Dhanaji Jalak) यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी आरोपी मिनी मलवाहू ट्रकचालक अंकुश केने याच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Deoli-Wardha Road Accident | strange accident on deoli wardha route retired police officer killed two critical

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Pune Crime | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून, खून करणाऱ्या आरोपीची मुळशीत आत्महत्या

 

The post Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article