Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात
बहुजननामा ऑनलाईन – Gas Cylinder Price | दिवाळीनंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 115 रूपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये ‘इंडेन’चे 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 115.5 रूपये, कोलकतामध्ये 113 रूपये, मुंबईमध्ये 115.5 रूपये आणि चेन्नईमध्ये 116.5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अर्थात ही कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झाली आहे. घरगूती सिलेंडरचे दर गेल्या 6 जुलैपासून बदलले नाहीत. (Gas Cylinder Price)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरचे दर निश्चित करत असतात. सलग आठ महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयओसीएल नुसार, 1 नोव्हेंबरपासून 14.2 किलोचा घरगूती गॅस सिलेंडर जुन्या दरांनीच मिळणार आहे परंतू व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झालेल्या स्वस्त मिळणार आहे. दिल्लीमध्ये ‘इंडेन’चे 19 किलो व्यावसायिक सिलेंडर 1859.5 रुपयांऐवजी 1744 रुपयाला मिळेल.
तसेच
कोलकातामध्ये कमर्शियल सिलेंडर 1846 रुपयांना मिळेल. यापूर्वी हा सिलेंडर 1995.50 रुपयांना मिळत होता. मुंबई में कमर्शियल सिलेंडर 1844 रुपयांऐवजी 1696 रुपयांना मिळेल.
चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर 1893 रुपये असतील। यापूर्वी 2009.50 रुपये दर होते.
14.2 किलो सिलेंडरचे दर
कोलकाता 1079
दिल्ली 1053
मुंबई 1052.5
चेन्नई 1068.5
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gas Cylinder Price | A big relief to the people who are suffering from inflation! 115 rupees reduction in gas cylinder price
हे देखील वाचा :
Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी
The post Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात appeared first on बहुजननामा.