Header

MP Gajanan Kirtikar | ‘…ते सर्व एका क्षणात कसे विसरलात?’; अरविंद सावंतांचा गजानन कीर्तिकर यांना सवाल

MP Gajanan Kirtikar | ‘…ते सर्व एका क्षणात कसे विसरलात?’; अरविंद सावंतांचा गजानन कीर्तिकर यांना सवाल

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात (Shinde Group) गेले. त्यात, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आणि गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. गजानन कीर्तिकरांनी (MP Gajanan Kirtikar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे गटातून (Uddhav Thackeray Group) गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्यात आली.

 

त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटातून कीर्तिकरांची (MP Gajanan Kirtikar) टीका होत होती. आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी सुद्धा कीर्तिकरांची टीका केली आहे. “1966 चा मी शिवसैनिक (Shivasena) आहे. 1968 चा मी गटप्रमुख होतो. चंद्रकांत खैरेंनी निवडणूक (Chandrakant Khaire) लढवली, त्यावेळी आम्ही प्रचारात अग्रणी होतो. आम्ही काही आमदार वगैरे झालो नाही. किर्तीकर मात्र नगरसेवक झाले, आमदार झाले, मग मंत्री झाले. मी लोकाधिकारच्या चळवळीतही सुरुवातीपासून होतो. माझा भाऊ किर्तीकरांसोबत काम करत होता. मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की चारवेळा आमदार आणि दोन वेळा खासदारपद तुम्हाला मिळालं. त्यानंतर तुम्ही राज्यमंत्रीही झाले होता. हे सर्व एका क्षणात कसे विसरलात?” असा सवाल अरविंद सावंत यांनी कीर्तिकरांना केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पुढे सावंत म्हणतात, “शिवसेनेत (Shivsena) वरीष्ठ-कनिष्ठ असा प्रकार कधीच नव्हता.
शिवसेनेत पक्षप्रमुख यांचा आदेश अंतिम असतो. आता ते ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले आहेत,
ते तर किती कनिष्ठ आहेत. मग त्यांचं नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना असे म्हणण्याचा कोणता अधिकार आहे?
एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला. आयुष्याचा सूर्य पश्चिमेला मावळत असताना आपल्याला कळायला पाहिजे
की मावळताना तरी किमान स्वाभिमानाने जावं. आम्हाला सगळ्यांना वाटतं की भगवा घेऊनच वर जावं.”

 

Web Title :- MP Gajanan Kirtikar | gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams

 

हे देखील वाचा :

Raveena Tandon | रवीना टंडनचे मोठे वक्तव्य ! “माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुपरस्टार पण आमिर- सलमान…”

Sanjay Raut | “त्याबाबतीत मी नारायण राणे, राज ठाकरेंना मानतो…”; संजय राऊतांचे कौतुकोद्गार

BJP Chitra Wagh On NCP Rajan Patil | ‘आता फोटोवर चपला मारून आंदोलन करणार का?’; राजन पाटलांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला सवाल

 

The post MP Gajanan Kirtikar | ‘…ते सर्व एका क्षणात कसे विसरलात?’; अरविंद सावंतांचा गजानन कीर्तिकर यांना सवाल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article