Pune Crime | 50 वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार, कोथरूडमधील CA ला अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीए ला पोलिसांनी अटक केली. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा प्रकार (Pune Crime) घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध सतीश शेठ (वय 42, कांचनगंगा होम्स, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या सीए चे नाव आहे. कोथरूड परिसरात त्याचे ऑफिस आहे. फिर्यादी महिला त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. (Pune Crime)
मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला क्लायंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी सोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई, पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत
याविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | chartered accountant arrested case of rape of woman yerwada by pune yerwada police
हे देखील वाचा :
Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव
Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR
Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड
The post Pune Crime | 50 वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार, कोथरूडमधील CA ला अटक appeared first on बहुजननामा.