Header

Pune Crime | शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या फायरींगचा बदला घेण्यासाठी दोघा गुन्हेगारांचा सपासप वार करुन खून; येरवड्यातील घटना

Pune Crime | शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या फायरींगचा बदला घेण्यासाठी दोघा गुन्हेगारांचा सपासप वार करुन खून; येरवड्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | शंकर चव्हाण (Shankar Chavan) यांच्यावर केलेल्या फायरींगचा बदला घेण्यासाठी ८ ते १० जणांच्या टोळ्याने दोघा गुंडावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून (Murder In Yerwada Pune) झालेल्यांची नावे आहेत. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी सुभाष राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड याने २००८ -०९ च्या दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर फायरिंग केले होते. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता.

 

अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक जण पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरुन जात होते.
त्यावेळी ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडविले.
त्यांच्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुण खून केला. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा पळून गेला.
ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे घटनास्थळी पोहचले.
त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला असून येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | In revenge for the firing on Shankar Chavan, two criminals were stabbed to death; incident in Yerwada

 

हे देखील वाचा :

Maharashtra Winter Session 2022 | संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन रंगणार; विरोधक करणार ईडीच्या चौकशीची मागणी

Malaika Arora | मलायका अरोराने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा ; म्हणाली…

Latur ACB Trap | महसूल विभागाचा लिपीक लाच घेताना दुसऱ्यांदा अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepika Padukone | दीपिका पादुकोण ‘या’ कारणाने पुन्हा एकदा आली चर्चेत; काय आहे नेमके प्रकरण?

 

The post Pune Crime | शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या फायरींगचा बदला घेण्यासाठी दोघा गुन्हेगारांचा सपासप वार करुन खून; येरवड्यातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article