Header

Pune Crime | हप्ता देण्यासाठी हॉटेलची तोडफोड करुन मॅनेजरच्या खूनाचा प्रयत्न, सोमवार पेठेतील घटना

Pune Crime | हप्ता देण्यासाठी हॉटेलची तोडफोड करुन मॅनेजरच्या खूनाचा प्रयत्न, सोमवार पेठेतील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दारू पिऊन येऊन हॉटेल चालकाने हप्ता द्यावा, यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड करुन मॅनेजरच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणाऱ्या सराईत गुंडाला (Criminal) पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

सुरज ऊर्फ गोट्या किरण लडकत Suraj aka Gotya Kiran Ladkat (वय ३३, रा. सोमवार पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर कमलाकर डांगे Sudhakar Kamlakar Dange (वय २६, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २००/२२) दिली आहे. ही घटना नरपतगिरी चौकातील हॉटेल राजधानी (Hotel Rajdhani) येथे रविवारी रात्री अकरा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल राजधानी येथे मॅनेजर आहेत.
सुरज लडकत हा दारु पिऊन हॉटेलमध्ये घुसला. त्याने फिर्यादी यांना “तू लय दम देऊन बोलतोय,
तुला मारुन टाकतो, तु बाहेर ये” असे मोठमोठ्याने आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली.
फिर्यादी यांच्या हॉटेलमधील कामगार गणेश धंदरे (Ganesha Dhandre) याला काही कारण नसताना
शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली. शर्टमध्ये लपविलेला कोयता बाहेर काढून
“मी भाई आहे या चौकातील, तुम्ही येथे धंदा करता, पण मला हप्ता देत नाही, तुला खल्लासच करतो,
असे बोलून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
फिर्यादी यांनी तो हुकविला असता त्याने हॉटेलमधील वस्तू, कुंड्यांची तोडफोड करुन नुकसान केले.
तसेच फिर्यादी यांचा मोबाइल खाली आपटून त्याचे नुकसान केले.
हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माळी (Assistant Police Inspector Mali) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | An attempt was made to kill the manager by vandalizing the hotel to pay installments, an incident in Somawar Peth

 

हे देखील वाचा :

Delhi Crime | वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या; शरीराचे केले 35 तुकडे

Pune Crime | पाच वर्षीय शाळकरी मुलीवर बस चालकाचा लैंगिक अत्याचार

Pune Crime | खूनातील फरार आरोपीला 8 महिन्यांनी गुजरातमधून अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे

 

The post Pune Crime | हप्ता देण्यासाठी हॉटेलची तोडफोड करुन मॅनेजरच्या खूनाचा प्रयत्न, सोमवार पेठेतील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article