Header

Pune Pimpri Crime | भोसरीत टोळक्याकडून दुकानांची तोडफोड, एकाला अटक

Pune Pimpri Crime | भोसरीत टोळक्याकडून दुकानांची तोडफोड, एकाला अटक

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन Pune Pimpri Crime | भोसरी येथील सदगुरुनगर येथे 8 ते 9 जणांच्या टोळक्याने एका दुध डेअरीसह (Milk Dairy) इतर दुकानांची कोयत्याने तोडफोड करत दहशत पसरविल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) भोसरी पोलिसांनी एकाला अटक (Arrest) केली आहे. तर त्याचे साथिदार फरार झाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजय विरेंद्र चव्हाण (वय-19 रा. सदगुरुनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे आहे. तर विजय चव्हाण, पंकज शर्मा, निलेश साळवे यांच्यासह 4 ते 5 अनोळखी आरोपींविरुद्ध आयपीसी 394, 394,397 सह भारतीय हत्यार कायदा (Indian Weapons Act), क्रिमीनल अमेंडमेंट अ‍ॅक्ट (Criminal Amendment Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याप्रकरणी प्रेषीत गणेश मोरे Preshit Ganesh More (वय-23 रा, सदगुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सदगुरुनगर येथे ‘आई दुध डेअरी’ आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ते डेअरीमध्ये काम करत असताना आरोपी विजय चव्हाण, पंकज शर्मा हे दुकानात आले. त्यांनी फिर्यादी यांच्यावर कोयता उगारून दुकानातील काउंटर, फ्रिज व दुकानाच्या बोर्डावर कोयत्याने मारुन नुकसान केले. तसेच दुकानाच्या गल्ल्यातील 2600 रुपये चोरून नेले.

 

तर आरोपींचे साथिदार अजय चव्हाण आणि निलेश साळवे व इतर 4 ते 8 जणांनी परिसरातील इतर दुकानात कोयते,
हॉकी स्टिकने तोडफोड करुन दुकानातील सामानांचे नुकसान केले.
या टोळक्याने हातातील कोयते व हॉकी स्टिक हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अजय चव्हाण याला अटक केली असून त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे (API Kalyan Ghadge) करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Shops vandalized by gang in Bhosari, one arrested

 

हे देखील वाचा :

Mithila Palkar | मिथिला पालकर तिच्या ड्रेसमुळे चर्चेत; नेटकऱ्यांनी पायपुसणी म्हणत केले ट्रोल

MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

Threat Letter To Rahul Gandhi | राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी ! मिठाईच्या दुकानात मिळालं लेटर; ‘तुम्हाला बॉम्बने…’

 

The post Pune Pimpri Crime | भोसरीत टोळक्याकडून दुकानांची तोडफोड, एकाला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article