Header

Sanjay Raut | संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

Sanjay Raut | संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधवारी गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणातून जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यांना जून महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ED) अटक केली होती. त्यानंतर गेले 100 पेक्षा जास्त दिवस ते न्यायालयीन कोठडीत होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांची सुटका होताच त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी भांडूप येथील आपल्या घराबाहेर भाषण दिले आणि शिंदे सरकारवर टीकांचा पाऊस पाडला.

 

न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरविली आहे. त्यामुळे आता त्यांना (केंद्र सरकार) कळेल की, त्यांनी किती मोठी चूक केली आहे. माझ्या अटकेचे आदेश दिल्लीवरुन आले होते, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसले आहेत. त्या गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) नाव घेण्याचा अधिकार नाही. देशात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आहे. भाजपने (BJP) मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली. पण तसे काही होणार नाही. त्यांनी शिवसेना फोडली. आमचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले. शिवसेना नाव गोठविण्याचा प्रयत्न केला. आणि तो अजून देखील सुरु आहे. त्यांच्या सर्वांच्या छाताडावर बसून शिवसेना त्याच तेजाने आणि वैभवाने आकाशाला गवसणी घालणार आहे, असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मला बेकायदा अटक केली गेली होती. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला गेला होता. पण आता मी सुटलो आहे.
आता सुसाट सुटायचे आहे. मी अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर काम केले आहे.
मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation (BMC) गेली अनेक वर्षे भगवा फडकत असून, तो यापुढेही फडकत राहील.
त्याला हात घालण्याचा प्रयत्न जे करतील, त्यांचे हात जळून जातील. आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मशाल आहे,
असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader sanjay raut gets- bail in money laundering case slams cm eknath shinde and group after released from jail

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | अनिल परबांना न्यायालयात हजर राहून हिशोब द्यावा लागणार – किरीट सोमय्या

Sanjay Raut | ‘मला माहित आहे राज्यकारभार कोण चालवत’ पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा चिमटा

Shambhuraj Desai | ‘धोतऱ्याच्या कडू बिया’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शंभूराज देसाई यांचा टोला, म्हणाले-‘102 दिवस कारागृहात असल्यामुळे त्यांना…’

 

The post Sanjay Raut | संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article