Header

Shahnaz Gill | धडक चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर शहनाज गिलचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Shahnaz Gill | धडक चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर शहनाज गिलचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

बहुजननामा ऑनलाईन ‘बिगबॉस सीझन-१३’ (‘Bigg Boss Season-13’) फेम शहनाज गिल (Shahnaz Gill) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दरम्यान ती लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार (Shahnaz step into Bollywood)आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये आल्यानंतर शहनाज गिल लोकप्रिय झाली आणि प्रत्येकाच्या आवडत्या यादीत तिचा समावेश झाला. आज ती केवळ पंजाबची कतरिनाच (Katrina in Punjab) नाही तर संपूर्ण देशाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शहनाज गिलची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होतात. नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शहनाज गिलचा डान्स व्हिडिओ

 

 

दरम्यान नकताच शहनाज गिलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही लोकांसह ‘धडक’ चित्रपटातील (Dhadak movie) ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स (Shahnaz Gill’Zingat’Song Dance) करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ‘झिंगाट’ची सिग्नेचर स्टेप खूप छान करत आहे. तिच्या प्रत्येक हालचालीने चाहते वेडे झाले आहेत.तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. शहनाजचा हा डान्स लोकांना खूप आवडतो.तिच्या या लूकबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल पांढऱ्या रंगाच्या मिडीमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. तिने पांढरा ड्रेस घातला आहे.केसांच्या बटा काढत तिने केसात पोनी घातली आहे.या लुकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

शहनाज गिलचा नवीन चॅट शो
शहनाज गिल आता लोकप्रिय स्टार बनली आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ (‘Kisi ka bhai kisi ki jaan’ Movie) या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवणार आहे.
तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ (‘Desi Vibes with Shahnaz Gill’) नावाचा चॅट शोही (chat show) सुरू झाला आहे.
यापूर्वी राजकुमार राव तिच्या चॅट शोचे पहिले पाहुणे म्हणून आले होते.
या क्षणी शहनाज गिल आता तिच्या करिअरच्या उंचीकडे वाटचाल करत आहे आणि तिचे चाहते तिच्यासाठी खूप खुश आहेत.

 

Web Title :- Shahnaz Gill | bigg boss fame shehnaaz gill danced on zingaat songh video got viral

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीला घातला 40 लाखांचा गंडा, सांगवी परिसरातील घटना

Eknath Khadse | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर एकनाथ खडसेंची चक्क कविता; लिहितात, ” जशी एका प्रेयसीची आठवण तशी…”

Uddhav Thackeray | “जे स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये”; राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचे भाजपला उत्तर

 

The post Shahnaz Gill | धडक चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर शहनाज गिलचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article