Header

South Superstar Mahesh Babu | दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचं निधन, 2 महिन्यांपुर्वीच आईने घेतला होता अखेरचा श्वास

South Superstar Mahesh Babu | दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचं निधन, 2 महिन्यांपुर्वीच आईने घेतला होता अखेरचा श्वास

बहुजननामा ऑनलाईन साऊथ सुपरस्टार महेश बाबू (South Superstar Mahesh Babu) याचे वडील कृष्णा घट्टमनेनी (Krishna Ghattamaneni) (घट्टामनेनी कृष्णा) यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकारामुळे (Heart attack) आज पहाटे निधन झाले. महेश बाबूचे वडील (Mahesh Babus father) कृष्णा घट्टामनेनी हे प्रख्यात तेलुगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक त्याबरोबर ते एक राजकारणीही होते. ५ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना सुपरस्टारचा टॅग मिळाला. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (South Superstar Mahesh Babu)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कृष्णा घट्टमनेनी दोन विवाह केले होते. इंदिरा या पहिल्या पत्नी आणि विजय निर्मला या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांना पहिल्या पत्नी इंदिरापासून ५ मुले आहेत. ५ मुलांपैकी २ मुले आणि ३ मुली आहेत. रमेश बाबू आणि महेश बाबू अशी या मुलांची नावे आहेत. दोन्ही भाऊ चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. केवळ कृष्ण घट्टमनेनीच नाही तर त्यांच्या दोन्ही बायकासुद्धा आता या जगात नाहीत. (South Superstar Mahesh Babu)

 

वयाच्या ७९ व्या वर्षी चित्रपटसृष्टीने (Film Indusrty) एक दिग्गज गमावला आहे.
सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती.
हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ४ वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महेश बाबूच्या वडिलांचे निधन सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा घट्टमनेंनी रुग्णालयात दाखल केले होते.

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव कृष्ण घट्टमनेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. कृष्णा घट्टमनेंनी चित्रपटसृष्टीतील ५ वर्षांच्या योगदानाचे स्मरण केले. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून महेश बाबूचे चाहतेही भावूक झालेआहेत.सोशल मीडियावरील चाहते आणि सेलिब्रिटींनी दिग्गज टॉलीवूड स्टारला श्रद्धांजली वाहिली. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महेश बाबू यांच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. कुटुंब एका भावनिक शोकांतिकेतून जात आहे.
महेश बाबूने २ महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले.
आई गमावण्याच्या दु:खातून महेश बाबूचे कुटुंब बाहेरही आले नव्हते की आता अभिनेत्याच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेली.
महेश बाबू त्याच्या आई-वडिलांच्या खूप जवळ होता. अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.
पण आता हीच चित्रे आणि आई-वडिलांच्या आठवणीच फक्त शिल्लक आहेत.

 

Web Title :- South Superstar Mahesh Babu | mahesh babu father ghattamaneni krishna passes away after suffered cardiac arrest

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आजारी मामाला पाहायला जाणं पडलं 55 लाखात, चोरट्यांचां रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला; पुणे जिल्ह्यातील घटना

Vinayak Raut | ‘गद्दारांना पुन्हा घरात घेऊ नका, ती कीड आहे’ – विनायक राऊत

Devendra Fadanvis | “चार जागांसाठी शिवसेनेची बेईमानी…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

 

The post South Superstar Mahesh Babu | दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचं निधन, 2 महिन्यांपुर्वीच आईने घेतला होता अखेरचा श्वास appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article