AUS vs SA Test Series | पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; ‘हा’ प्रमुख गोलंदाज टीममधून बाहेर
बहुजननामा ऑनलाईन टीम : AUS vs SA Test Series | ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुढील आठवड्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडला संघातून वगळले आहे. निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी 14 जणांचा संघ जाहीर केला आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 ते 21 डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. (AUS vs SA Test Series)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी संघ निवडीबाबत सांगितले की, “पॅट कमिन्समध्ये सुधारणा होत आहे. त्याने शनिवारी गोलंदाजी केली. त्यामुळे तो या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र, जोश हेझलवूडला पूर्णपणे सावरण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. त्यांच्या जागी मायकेल नेसर आणि लान्स मॉरिस यांना संघात घेण्यात आले आहे.
SQUAD: The first of a blockbuster three Test series against South Africa gets underway this Saturday, and the squad is locked in and ready to go
pic.twitter.com/smQXDqPr8N
— Cricket Australia (@CricketAus) December 12, 2022
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन,
मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस,
मायकेल नेसर आणि मिचेल स्टार्क.
Web Title :- AUS vs SA Test Series | aus vs sa 1st test australias test squad for the match against south africa has been announced excluding josh hazlewood
हे देखील वाचा :
IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
The post AUS vs SA Test Series | पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; ‘हा’ प्रमुख गोलंदाज टीममधून बाहेर appeared first on बहुजननामा.