Header

BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांनी नागपुरात रेशीम बागेतील (Reshim Bagh) संघ कार्यालयाला भेट दिली. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील अशी टीका राऊतांनी केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले त्याचा त्रास संजय राऊतांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली, असा घणाघात आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. शेलार म्हणाले, मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले त्याचा त्रास संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस (Congress), नवाब मलिक (Nawab Malik), असलम शेख (Aslam Sheikh) यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर (Yakub Memon Grave) रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच! असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

 

याशिवाय हिंदूंना सडके म्हणणारा सर्जील उस्मानी (Sergil Usmani) तुम्हाला प्रिय, दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!! अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

 

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

रेशीमबागला जाणे चुकीचं नाही, हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं
जात असलतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहात खाकी पॅन्ट घालून आले तरी मी त्यांचं स्वागत करेन,
असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticizes shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Bhumi Pednekar | अखेर भूमीने सांगितला ‘त्या’ सेक्स सीन मागील तिच्या भावना; म्हणाली “हा सिन करताना…….”

Nitin Manmohan Passed Away | बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचं निधन

CM Eknath Shinde | सत्तेत असलेल्या भाजप आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; म्हणाले….

 

The post BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article