Kriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा
बहुजननामा ऑनलाईन टीम – Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या ‘आदीपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एवढेच नाही तर अभिनेता प्रभास आणि ती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चादेखील समोर आल्या होत्या. क्रितीने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच तिचा ‘भेडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातदेखील तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. वरुण धवन या चित्रपटात तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे, तर क्रितीने नुसताच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चर्चेचा विषय आहे. (Kriti Sanon)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कृतीने instagram वर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, “केवळ एका महिलेसाठी माझे हृदय धडधडतं”. भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीने जेव्हा कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती, यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. या कार्यक्रमात माधुरी परीक्षकाच्या भूमिकेत आहे. जेव्हा दोघींनी डान्स केला तेव्हाचा हा व्हिडिओ तिने तिच्या instagram वर पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंतीदेखील दर्शवली आहे. (Kriti Sanon)
भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिती आणि वरुण विविध ठिकाणी गेले होते. या चित्रपटातील ठुमकेश्वरी हे गाणे मात्र सध्या जोरात गाजताना दिसत आहे. क्रितीला यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. क्रितीने अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. क्रिती मूळ पेशाने इंजिनियर आहे. मात्र, तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे, तर क्रिती ही मूळची दिल्लीची आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kriti Sanon | bhediyan actress kriti sanon shared danced video with madhuri dixit at zhalak dikh la ja
हे देखील वाचा :
Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना
Pune Crime | सूसमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक
The post Kriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा appeared first on बहुजननामा.