Header

MNS Chief Raj Thackeray | ‘मनसेचं हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवणार’, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

MNS Chief Raj Thackeray | ‘मनसेचं हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवणार’, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भविष्यात मनसेची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील हे पोट्ट काय करणार? मात्र काही दिवसांनी हे पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा इशारा राज ठाकरे यांनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर एकेकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. आज भाजपचा (BJP) आहे आणि कालांतराने हेही चित्र बदलेल. जे आपल्यावर हसताहेत त्यांनी हसावं. हे पोट्टं काय करणार असंही तुम्हाला काही लोक बोलत असतील तर बोलू द्या. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोट्ट तुमच्यावर वरंवटा फिरवणार, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले.

 

राज ठाकरे पुढे म्हणाले, मनसेला पदाधिकारी मिळत नाहीत अशा बातम्या काहींनी दिल्या.
अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी आज नियुक्ती पत्रकं सर्वांसमोर वाटत आहे.
पक्ष वाढवणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आज जो पक्ष बहुमताने सत्तेत आहे.
त्यालाही बहुमत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पहावी लागली आहे. आज सर्वकाही इंस्टंट हवं असतं.
पण राजकारणात इंस्टंट गोष्टी चालत नाहीत. महात्मा गांधीचं (Mahatma Gandhi) एक चांगले वाक्य आहे,
जेव्हा तुम्ही शुल्लक वाटत असतात तेव्हा तुम्हाला कुणी महत्व देत नाही.
पण आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हाच सगळे आपल्याशी लढायला येतील.
फक्त तुमच्यामध्ये आग असली पाहिजे. पराभव होईल पण खचून चालणार नाही. पराभव कुणाचा नाही झाला.
दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मनसेचं पोट्ट काय करणार असं आज तुम्हाला बोलत असतील,
पण हेच पोट्ट उद्या तुमच्यावर वरवंटा फिरवणार, असे राज ठाकरे म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | those who want to laugh should laugh but remember mns will be in power says raj thackeray

 

हे देखील वाचा :

Jayant Patil Suspension | जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांचा अजित पवारांना फोन (व्हिडिओ)

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसमधून करायची असेल कमाई तर अशी करा गुंतवणूक, भासणार नाही पैशांची अडचण

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या पदवीसाठी तीन वर्षांचे बंधन

 

The post MNS Chief Raj Thackeray | ‘मनसेचं हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवणार’, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article