Header

Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन Pandharpur Accident | पंढरपूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. करकंब परिसरात ऊसतोड कामगारांना‌ (Sugarcane Workers) घेऊन‌ जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडला. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात (Pandharpur Accident) तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व ऊस तोडणी कामगार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पंढरपूर येथील एक ट्रॅक्टर ऊसतोड मजुरांना ऊस तोडणीसाठी फडात घेऊन जात होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उजनी कालव्यात (Ujani Canal) पडला आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी पोलीसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
मृत मजूर मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील कोलकी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pandharpur Accident | accident in pandharpur tractor falls into ujani canal 3 women including 2 children passed away on the spot

 

हे देखील वाचा :

Indian Railway Job Recruitment | बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

SSC HSC Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपये शुल्क

Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

 

The post Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article