Header

Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार

Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने सहा वर्षांच्या मुलाला मारहाण केली. तसेच मारहाण केल्याचे घरी सांगितले तर आणखी मारेन, अशी धमकी मुलाला दिली. मुलाने हा प्रकार वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी वर्गशिक्षिकेविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा सहा वर्षांचा मुलगा लुल्लानगर येथील केंद्रीय महाविद्यालयात शिकण्यास आहे.
फिर्यादी यांच्या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे संबंधित शिक्षिकेने त्याला हाताने मारहाण केली.
तसेच यानंतर जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेन,
अशी धमकी या शिक्षिकेने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | lady teacher beaten first standard student for bad hadwriting also threatening him in pune crime news

 

हे देखील वाचा :

Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Vasant More | वसंत मोरे मनसे सोडण्याच्या तयारीत?; लग्नसमारंभात अजित पवारांची घेतली भेट

Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

Mumbai Crime | वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्म बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

 

The post Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article