Header

Pune Crime | पुण्यात तीनवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; नराधमास अटक

Pune Crime | पुण्यात तीनवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; नराधमास अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | घराशेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव प्रशांत पडवळ असून, तो वैष्णो सिटी, फेज 2, उरुळी देवाची येथे राहतो. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 6 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीचे कुटुंब आरोपी प्रशांत पडवळच्या घराशेजारी राहण्यासाठी आले होते. नवरा, बायको आणि मुलगी असे हे कुटुंब असून नवरा-बायको दोघेही कामाला जातात. त्यांच्यासमोर मुलीला कुठे ठेवायचे असा प्रश्न होता. यावेळी नाईलाजाने त्यांनी घरासमोरच राहणाऱ्या पडवळ कुटुंबाकडे त्यांच्या तीनवर्षीय मुलीला ठेवले होते. (Pune Crime)

त्या दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळात त्यांची मुलगी पडवळ कुटुंबाकडेच होती.

दरम्यान, या मुलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले.
संध्याकाळी जेव्हा फिर्यादी घरी आल्या आणि त्यांनी मुलीला घेतले तेव्हा तिच्या गुप्तांगाला जखम असल्याचे
त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | 3 year old girl sexually assaulted in pune hadapsar accused who lives next to the house arrested

 

हे देखील वाचा :

Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतील’ – खासदार विनय सहस्त्रबुद्धे

Pune Crime | साडीवाटपाच्या बहाण्याने महिलेचे दागिने लंपास; लाल महल चौकातील घटना

Team India Schedule | बीसीसीआयकडून श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर

 

The post Pune Crime | पुण्यात तीनवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; नराधमास अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article