Header

Pune Traffic News | वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

Pune Traffic News | वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

बहुजननामा ऑनलाईन –  Pune Traffic News | मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वडगावशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका या दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन ३१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या दरम्यान खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी दिली आहे. (Pune Traffic News)

 

जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील नागरिक, विविध संघटना सहभागी होत असतात. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून जयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींच्या वाहनांकरीता पुणे- अहमदनगरनगर मार्ग हा मुख्य मार्ग असून अनुयायींची सर्व वाहने एकाचवेळी अहमदनगर रोडवरुन जयस्तंभाकडे येतात. मानवंदना दिल्यानंतर परत येणारे अनुयायी पुन्हा अहमदनगर रोडनेच जयस्तंभाकडून पुण्याकडे येत असतात. त्यामुळे नगर रोडवरील दोन्ही लेनवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. (Pune Traffic News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या केल्यामुळे अनुयायांच्या वाहनांकरीता जयस्तंभाकडे जाणाऱ्या व परत येणाऱ्या वाहनांकरीता जास्त जागा उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे, असेही वाहतूक पोलीस उपायुक्त मगर यांनी कळविले.

 

Web Title :- Pune Traffic News | BRT between Wadgaonsheri Chowk to Kharadi Old Zakat Naka Both lanes of the road opened

 

हे देखील वाचा :

Abhijit Bichukale | पुन्हा एकदा अभिजीत बिचुकलेच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Pune Crime News | वकिलाची पोलीस अधिकार्‍याला मारहाण; मार्केटयार्ड परिसरातील घटना

Pune Crime News | बहिण म्हणून ओळख सांगणार्‍या वडिलांना महिलेसोबत मुलीने पकडले रंगेहाथ लॉजवर; मुलीला मारहाण करुन कोंडून वडिल, महिला पसार

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला भर रस्त्यात बेदम मारहाण, येरवड्यात 2 गुडांच्या टोळ्यांचा 3 तास राडा

 

The post Pune Traffic News | वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article