Header

Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य

Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य

बहुजननामा ऑनलाईन टीम : Rohit Shetty | सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची. कालच या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला इतर राजकीय मंडळींनीदेखील हजेरी लावली होती. या महामार्गामुळे मुंबई नागपूर या दोन शहरांतील अंतर कमी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तर सर्व स्तरावरून या प्रकल्पाचे कौतुक करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या प्रकल्पाचे कौतुक केले होते, तर आता कलाक्षेत्रातूनदेखील याचे कौतुक करण्यात येत आहे. (Rohit Shetty)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ शेअर करत याचे कौतुक केले आणि त्याचबरोबर त्यांनी एक संदेशदेखील जनतेला दिला आहे. यावेळी रोहितने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री यांनी हा नवीन महामार्गाचा शुभारंभ केला आहे. ज्यामध्ये मुंबई नागपूर अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. वेग मर्यादा ताशी 150 किमी, प्रत्यक्षात ताशी 120 किमीने प्रवास अशी असणार आहे. मात्र, आपण सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे गाडी सुरक्षित आणि जबाबदारीने चालवली पाहिजे”. सध्या रोहित शेट्टी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

या महामार्गाचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे, तर ‘एमएसआरडीसी’ने पाच टप्प्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच 23 डिसेंबरला त्याचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर या चित्रपटांमध्ये रणवीर सिंग, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा या कलाकारांची मुख्य भूमिका असणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Rohit Shetty | director rohit shetty appericating the new samruddhi highway which inaugurated by pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार

Shah Rukh Khan | शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान त्याच्या ‘या’ वाईट सवयीबद्दल केला खुलासा

Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा

 

The post Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article