Header

Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut | शिवसेनेतून शिंदे गटात पलायन केलेले खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू या नावाने 44 फोन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या या दाव्याला त्यांनी बिहार पोलिसांचा पुरावा दिला आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्याच्या स्वत: वरच बलात्कारापासून विनयभंगाचे आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होता, अशा व्यक्तीने ठाकरेंवर आरोप केले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

राऊत म्हणाले की, राहुल शेवाळे यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचे आरोप आहेत. काल परवा पर्यंत ते शिवसेनेच्या ताटात जेवत होते. त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. म्हणजे जे फुटीर लोक आहेत, ते किती खालच्या थराला जाऊ शकतात, किती वैफल्यग्रस्त आहेत, हे स्पष्ट होत आहे. गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. विरोधकांना तोंड देताना त्यांची पळापळ सुरू आहे. सरकारची त्रेधा तिरपीट उडाली आहे. त्यावरून जनसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. आणि ते लोक असले आरोप करत असतील, तर मोठ्या भ्रमात आहेत, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तसेच शिंदे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेत आले आणि ते भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच कोसळेल.
त्यांनी आमच्यावर कितीही आरोप केले आणि आमच्यावर खटले भरले, तरी शिवसेना आणि शिवसैनिक
खचणार नाही. मागे हटणार नाही. हा खेळ करणाऱ्यांचे राज्य औटघटकेचे आहे व या सर्वांचा त्यांना
पश्चात्ताप होईलच, असेही राऊतांनी नमूद केले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut slams rahul shevale on aaditya thackeray sushant singh rajpur death

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार, दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

Chandrakant Patil | लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे- चंद्रकांत पाटील

Big Boss Season 16 | तिने खूप लोकांची घरे तोडण्याचा प्रयत्न केलाय; श्रीजिताचे टीना दत्तावर गंभीर आरोप…

Rohit Pawar | मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केले आदित्य ठाकरेंवर आरोप; खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपाला रोहित पवारांचे उत्तर

 

The post Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article