Sayali Sanjeev | अखेर सायलीने ऋतुराजच्या नात्याबद्दल केला खुलासा
बहुजननामा ऑनलाईन टीम : Sayali Sanjeev | सध्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे अभिनेत्री सायली संजीव चर्चेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत तिने तिच्या अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सायली चर्चेत असण्यामागचे कारणदेखील तेवढेच इंटरेस्टिंग आहे. क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि सायली एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता सायलीने या चर्चांवर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत सायलीने या विषयावर भाष्य केले आहे. (Sayali Sanjeev)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या आयपीएलपासूनच सायली आणि ऋतुराज यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर कमेंट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. सायलीने वन पीस घातलेला एक फोटो शेअर केला होता. ज्यावर ऋतुराजने वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केली होती. ऋतुराजच्या या कमेंटला सायलीनेदेखील रिप्लाय करत हार्ट इमोजी शेअर केली होती. त्यांच्या या कमेंटनंतर त्यांच्या अफेर्सच्या चर्चांना सुरुवात झाली. आता शेवटी सायलीने तिच्या आणि ऋतुराजच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (Sayali Sanjeev)
सध्या सायली गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमात सहभागी होत आहे. अशाच एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान तिला तिच्या आणि ऋतुराजच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. यावेळी तिने जे सांगितले ते ऐकून उपस्थितांनादेखील धक्का बसला. ती म्हणाली की, “मी आणि ऋतुराज हे चांगले मित्र होतो. आता या अशा चर्चांमुळे आमची मैत्रीदेखील तुटली आहे. आता आम्ही एकमेकांशी बोलतही नाहीत. माझं नाव त्याच्याशी जोडले जाते याची कल्पनाही मी केली नव्हती. माझे वय 29 तो 25 वर्षांचा एवढा आमच्या वयात फरक असूनही आमच्या नात्यावर अशी उलटसुलट चर्चा केली जात असल्यामुळे आता आमच्यात बोलणेही होत नाही”. सायलीच्या या उत्तराने तिच्या आणि ऋतुराजच्या नात्यांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sayali Sanjeev | marathi actress sayali sanjeev talk about ruturaj gaikwad relationship status
हे देखील वाचा :
BSNL Plan Offers | बीएसएनएलने आणला सगळ्यात स्वस्त डाटा पॅक बाजारात, जाणून घ्या किमती
Sangli Crime | मित्रांनी लग्न मोडून केली तरुणाला बेदम मारहाण
The post Sayali Sanjeev | अखेर सायलीने ऋतुराजच्या नात्याबद्दल केला खुलासा appeared first on बहुजननामा.