Header

Shahrukh Khan | …म्हणून युजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे केले कौतुक

Shahrukh Khan | …म्हणून युजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे केले कौतुक

बहुजननामा ऑनलाईन –  Shahrukh Khan | अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही रिलीज केले होते. चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच त्यावरून अनेक वाद झाले होते. सेम सिक्वेन्स या चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोप नेटकऱ्यांनी लावला होता, तर या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पादुकोण आणि जॉन इब्राहिम हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता शाहरुखने नुकतेच ‘डंकी’ चित्रपटाचे शूटिंगदेखील पार पडले आहे. त्याची माहिती त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली होती. पुन्हा एकदा शाहरुख खान चर्चेत असण्याचे कारण म्हणजे त्याने शेअर केलेले काही फोटोज जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शाहरुखने शेअर केलेले फोटोज सध्या तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवरून शाहरुखने मुस्लिम धर्मीयांच्या मक्का येथील पवित्र मशिदीला भेट दिल्याचे समजत आहे. या फोटोमध्ये अभिनेता अगदी साध्या शैलीत दिसत होता. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पांढरे वस्त्र परिधान केलेले दिसत आहे, तर आजूबाजूचा परिसर हा मक्का मशिदीचा असल्याचे समजत आहे.

 

 

या आधीच शाहरुखने एक पोस्ट शेअर करत लवकरच मक्का मशिदीला जाईन असे सांगितले होते,
तर आता त्याचे हे फोटोज चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे.
काही युजरने त्याला त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत अशा शुभेच्छा दिल्या,
तर काही युजर्संनी शाहरुखच्या साधेपणाचे कौतुकदेखील केले आहे.
शाहरुख खानव्यतिरिक्त आमिर खान, गौहर खान, सना खान आणि अली फजल यांसारखे स्टारदेखील
उमराह करण्यासाठी मक्का शरीफला पोहोचले आहेत. या स्टार्सचे फोटोही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Shahrukh Khan | shah rukh khan performs umrah at mecca sharif before pathaan release photos viral

 

हे देखील वाचा :

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Crime | ज्येष्ठाला लुटणाऱ्या कॅबचालकाला पोलिसांनी केली अटक; साथीदारांचा शोध सुरू

Pune Pimpri Crime | बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

IPL 2023 | ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून निवृत्ती; सीएसकेने त्याच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

 

The post Shahrukh Khan | …म्हणून युजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे केले कौतुक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article