Header

Sushma Andhare | ‘त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात…’; अनिल खोचरेंचा सुषमा अंधारेंना टोला

Sushma Andhare | ‘त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात…’; अनिल खोचरेंचा सुषमा अंधारेंना टोला

उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रबोधन यात्रेत येणे, म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम आहे, अशी टीका शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde Group) अनिल खोचरे (Anil Khochare) यांनी केली आहे. गेले दोन दिवस सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा उस्मानाबाद (Osmanabad News) जिल्ह्यात होती. यावेळी अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांचा चांगला समाचार घेतला. त्यानंतर, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना शिवसैनिकांवर (Shivsena) टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे उस्मानाबादचे नेते अनिल खोचरे यांनी केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

“एकेकाळी सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती, हिंदू देव देवतांबद्दल अपमानकारक वक्तव्ये केली होती. गेल्या वर्षभरात त्यांचं नेमकं काय प्रबोधन झालं? त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं?”, असा प्रश्न अनिल खोचरे यांनी केला.

 

ते म्हणाले, “त्यांना शिवसैनिकांवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम आहे,” अशी टीका अनिल खोचरे यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Sushma Andhare | sushama andhare eknath shinde group leader anil khochare criticize sushama andhare

 

हे देखील वाचा :

World Weightlifting Championship | मनगटाच्या दुखापतीवर मात करत मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

 

The post Sushma Andhare | ‘त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात…’; अनिल खोचरेंचा सुषमा अंधारेंना टोला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article