Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनानंतर प्रथमच माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनिअर केजीच्या वर्गाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी (Aditya Thackeray) माध्यमांशी संवाद साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० गद्दार आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणूका घेण्याची हिम्मत दाखवावी. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहटीला जातात. पण राज्यासाठी ते या ठिकाणी कधीच गेले नाहीत.’ तसेच यावर पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत. असे म्हणत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंनी महानगरपालिकेसंदर्भात एक गंभीर मुद्दा सर्वांसमोर मांडला.
ते म्हणाले, स्थायी समितीने १७०० कोटींची कामे मंजूर केली होती. मात्र ही कामे महापालिका आयुक्तांनी बदलली.
ही कामे आयुक्त अशी बदलू शकतात का? यावर काम सुरू आहे. खरोखर ७ हजार कोटीची कामे होऊ शकतात आणि जर होत असतील तर मग कल्याण, नागपूरला रस्ते का नाही झाले? यावर आमचा अभ्यास सुरू आहे. तसेच यावर कायदेशीरबाबींची पडताळणी सुरू आहे. असही यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला निवडणूकांचे खुले
आव्हान दिले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महापालिकेच्या निवडणूका घ्या,
नाहीतर विधानसभेच्या घ्या. पण या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची हिंम्मतचं नाहीये असा खोचक टोला
आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray slams cm eknath shinde and dy cm devendra fadnavis
हे देखील वाचा :
Raj Thackeray | ‘…तर जैन धर्माला नको असलेल्या गोष्टी तेथे घडतील’, राज ठाकरेंची झारखंड सरकारला विनंती
Chhagan Bhujbal | शरद पवारांना जाणता राजा म्हणणारच, छगन भुजबळांचे विरोधकांना प्रत्युत्तर
The post Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’ appeared first on बहुजननामा.