Header

BJP MLA Nitesh Rane | ‘आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर’ नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र; अजित पवारांवरही साधला निशाणा

BJP MLA Nitesh Rane | ‘आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर’ नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र; अजित पवारांवरही साधला निशाणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर वक्तव्य करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. अजित पवारांची बाजू घेताना आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असे वक्तव्य करुन त्यात आणखी भर घातली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी दोन पानाचे पत्र जितेंद्र आव्हाड यांना लिहलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केलं आहे. राणे पत्रात म्हणाले, औरंगजेबाबाबत ‘औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडलं असतं ना?’ असे केलेले वक्तव्य स्वाभाविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर (Aurangzeb) आहे, हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तह आयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे (Hindavi Swarajya) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले,
काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत
असे घोषित करतात. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले.
आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे.
मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही,
अशा शब्दात नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘अशी विधानं करताना लाज-शरम वाटली पाहिजे’, शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Pune Crime News | पेरणे फाटा येथील बसस्थानकावर पाच जणांचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास

 

The post BJP MLA Nitesh Rane | ‘आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर’ नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र; अजित पवारांवरही साधला निशाणा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article