Header

Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू

Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – Building Collapse | ठाण्यामध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमक दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आज पहाटेच्या सुमारास हि भीषण दुर्घटना घडली आहे. (Building Collapse)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हाती आलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली एक जुनी जी प्लस टू इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. या भीषण दुर्घटनेत एक जणाला आपला जीव आपला गमवावा लागला आहे. माजिद अन्सारी असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव होते. ते 25 वर्षांचे होते. आज पहाटेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेतील लोकांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमक दलाकडून बचावकार्य सुरु आहे. (Building Collapse)

 

लखनऊमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात दोन दिवसांपूर्वी अशीच एक 5 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सपा नेते अब्बास हैदर यांच्या आई आणि पत्नीचा मृत्यू मृत्यू झाला होता.ही घटना हजरतगंज येथील वजीर हसन रोडवर घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेत 16 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात बचाव पक्षाला यश आले होते. या दुर्घटनेनंतर निकृष्ठ बांधकामामुळे ही इमारत कोसळल्याचा आरोप केला जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Building Collapse | big accident in bhiwandi due to collapse of building

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Daund Murder Case | दौंड मधील 7 जणांच्या हत्याकांडाचे गुढ वाढलं, अंत्यविधी केलेले मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी बाहेर काढले

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…

 

The post Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article