Header

Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका

Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Politics | गेली २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचे काम केले तेच आज नाक मुरडत आहेत. अशी टीका शिंदे गटाचे नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी ठाकरे गटावर केली आहे. आज दि.१९ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबई येथे येणार आहेत. त्यावर बोलताना ठाकरे गटातील नेत्यांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे नेते म्हणाले होते की, आमच्या सरकारच्या काळात भूमीपूजन झालेल्या कामांचे श्रेय आता शिंदे-फडणवीस सरकार घेत आहेत. आणि तीच कामे आमची असं विद्यमान सरकार दाखवत आहे. त्यावर आज बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी गेलेल्या शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी बोलताना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर म्हणाले की, मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम कुणी केले? मुंबईकरांचा विश्वासघात इतकी वर्षे कुणी केला? आज तेच लोक आमच्यावर आरोप करत आहेत. करोना काळातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे त्याची पोलखोल होण्यास सुरूवात झाली आहे. हा सगळा भ्रष्टाचार लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असंही यावेळी किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईकरांच्या विकासाठी त्यांना पुढची किमान २५ वर्षे खड्डे मुक्त रस्त्यांवरून जाता यावं यासाठी आम्ही काम करतो आहोत असंही ते म्हणाले. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी यावर बोलू नये. असा टोला त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांना लगावला. (Maharashtra Politics)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना किरण पावसकर म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाचा ठसा जगभर उमटवला आहे. जर ते मुंबईला विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत असतील तर त्यावरून श्रेयवाद उद्भवू नये. टीका करणाऱ्यांना कुठे टीका करावी हे देखील कळत नाही. असा टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाला लगावला.

 

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावर बोलताना किरण पावसकर म्हणाले की,
‘बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधीमंडळात लागतं आहे ही अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या विचारांपासून तुम्ही (उद्धव ठाकरे) दूर गेला आहात.
आता जे तैलचित्र लावलं जातं आहे त्याचा अभिमान बाळगा त्यावरून राजकारण करू नका.
बाळासाहेब ठाकरे यांची जी कर्तबगारी होती तशी तर त्यांच्या मुलाला दाखवता आलीच नाही.
खरं तर ते मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय घ्यायला हवा होता.
आता जर आम्ही ते तैलचित्र विधीमंडळात लावत असू तर उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray)
त्यावरून राजकारण करू नये.’ असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde group shivsena leader kiran pavaskar slams uddhav thackeray and aditya thackeray on potholes issue in mumbai

 

हे देखील वाचा :

State Education Quality Index | राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; ‘पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना येईना वजाबाकी, भागाकार…’

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Aurangabad Crime News | वाळू माफियांकडून पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस गंभीर जखमी

 

The post Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article