Header

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाचा (Brother) घरासमोर डोके फोडून खून (Murder) केला. त्यानंतर मृतदेह नांदगाव येथे नेऊन जळून टाकला, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केला आहे. नारायण राणे हे हैवानाची औलाद असून त्यांची नार्को टेस्ट (Narco Test) करा अनेक खूनांना वाचा फुटेल असा गंभीर आरोप विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केला आहे.

 

कणकवली येथे आयोजित कार्याक्रमात खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, याठिकाणच्या आमदाराची उंची किती, डोकं केवढं त्याच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा तरीही ते आकांडतांडव करतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट. हे करताना त्यांनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्ख्या चुलत भावाचे घरासमोर डोकं फोडून त्याला गाडीत घालून नांदगावला नेऊन जळून टाकले, असा राणेंचा इतिहास असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एसआयटी चौकशी झाली पाहिजे

नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले, लोक बेपत्ता झाले या सर्वांची एसआयटीमार्फत
चौकशी (SIT Inquiry) झाली पाहिजे. नाहितर नारायण राणे यांची नार्को टेस्ट करा.
जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडवला हे सगळ्यांना समजेल. असेही विनायक राऊत म्हणाले.
यावर आता राणे कुटुंबाकडून कशी प्रतिक्रिया दिली जाते हे पहावे लागेल.

 

 

Web Title :- MP Vinayak Raut | bjp union minister narayan rane killed his brother do his narco test says mp vinayak raut

 

हे देखील वाचा :

BSNL | नवीन वर्षात ‘बीएसएनएल’ने दिला यूजर्सला धक्का, बंद केले आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

Jalyukta Shivar Yojna | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

Nana Patekar | नाना पाटेकर यांचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन; ज्याच्यावर केली टीका त्याच्याच चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

 

The post MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article