Header

Nashik Accident | नाशिकमधील अपघातात होतकरु कबड्डीपटू तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Accident | नाशिकमधील अपघातात होतकरु कबड्डीपटू तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण : बहुजननामा ऑनलाईन  कल्याणमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नाशिक या ठिकाणी झालेल्या बसच्या अपघातात (Nashik Accident) एका होतकरु कबड्डीपटू तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. दिक्षा गोंधळी असे या कबड्डीपटू तरुणीचे नाव आहे. ती आपल्या आई वडिलांसोबत शिर्डीला गेली होती. या अपघातात (Nashik Accident) दिक्षाची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. दिक्षाची बहीण समिक्षा हिचे सायन्सचे क्लास असल्याने ती शिर्डीला जाऊ शकली नाही. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात हे गोंधळी कुटुंब राहते. मोरीवली गावात दिक्षाची काकी रहाण्यास असून त्यांच्यासोबत गोंधळी कुटुंब हे शिर्डीला जाण्यास निघाले होते. हे कुटुंब दरवर्षी शिर्डीला जात असते. दिक्षा ही डोंबिवलीमधील मॉडेल महाविद्यालयात 11 वी मध्ये शिकत होती. तिचे वडील हे ठाणे येथे खासगी नोकरी करत होते. (Nashik Accident)

दिक्षा ही महाविद्यालयात कबड्डी आणि शॉर्ट बॉल खेळत असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींनी दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बस अपघातात एकूण 10 भाविक जागीच मृत्यू पावले होते.

 

Web Title :- Nashik Accident | kalyan kabaddi player diksha gondhali lost live

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | राखी सावंतचा आदिल खान दुरानी सोबतच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Pune Crime News | पुणे मार्केटयार्ड परिसरातील तिघांच्या अपहरणाचे नगर कनेक्शन; श्रीगोंदा तालुक्यातील सरपंच निघाला मुख्य सुत्रधार

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…

 

 

The post Nashik Accident | नाशिकमधील अपघातात होतकरु कबड्डीपटू तरुणीचा दुर्दैवी मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article