Header

Pune Crime | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक, 10 गुन्हे उघडकीस

Pune Crime | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक, 10 गुन्हे उघडकीस

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | पुणे शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र (Mangalsutra) हिसकावुन नेणाऱ्या दोन आरोपींना सिहंगड रोड पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ही कारवाई सनसिटी भागात केली. त्यांच्या एका साथीदाराला यापूर्वीच अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय-20 रा. धनगर वस्ती, देवाची उरुळी, पुणे), राजु महादेव डेंगळे (वय-19 रा. प्रतिकनगर, कोंढवा रोड, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार गजानन दत्तात्रय बोऱ्हाडे (वय-30 रा. हिवरकर मळा, सासवड) याला 23 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीमध्ये व पुणे शहरात चैन स्नेचिंगच्या (Chain Snatching) गुन्ह्यांचा तपास पोलीस करत होते. सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सनसिटी रोड भागात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राहुल ओलेकर (Rahul Olekar), शिवाजी क्षिरसागर (Shivaji Kshirsagar), अमोल पाटील (Amol Patil) यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सनसिटी रोड परिसरात सापळा रचला. त्यावेळी खाडे वॉशिंग सेंटरच्या समोर दोन जण संशयितरित्या उभे असल्याचे आढळून आले.

 

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान, 3 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास धायरी येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावुन नेल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी त्यांचा साथीदार गजानन बोऱ्हाडे याच्या मदतीने पुणे शहरात विविध ठिकाणी चैन स्नेचिंगचे गुन्हे केल्याचे कबुल केले. आरोपींकडून सिंहगड पोलीस ठाण्यातील -5, भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station) -2, समर्थ (Samarth Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar),
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलीस उप-निरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi),
सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, धनंजय शेटे, सुनिल साळुंखे, राजु वेगरे,
अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, स्वप्नील मगर,
विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेंडगे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Sinhagad Police Arrested Two For Grabbing Mangalsutra From Women’s Neck, 10 Crimes Revealed

 

हे देखील वाचा :

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची पहिली कारवाई

Sadabhau Khot | ‘रोहित पवार सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत;’ सदाभाऊ खोत यांची रोहित पवार यांच्यावर टीका

 

The post Pune Crime | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक, 10 गुन्हे उघडकीस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article