Header

Pune Crime News | ‘मोठा भाई झालास का’? ‘थर्टी फस्ट’ला वर्चस्वातून 2 गुंडाच्या टोळ्यात राडा, उत्तमनगरमधील घटनेत 7 जणांना अटक

Pune Crime News | ‘मोठा भाई झालास का’? ‘थर्टी फस्ट’ला वर्चस्वातून 2 गुंडाच्या टोळ्यात राडा, उत्तमनगरमधील घटनेत 7 जणांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | उत्तमनगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून नववर्षाच्या सुरुवातीला गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये जोरदार धुमचक्री उडाली. त्यात एकमेकांवर कोयत्याने वार करत दगड, फरशीने हाणामारी करुन जखमी करण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) दोन्ही टोळ्यांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Attempt To Murder) दाखल करुन ७ जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत गौरव गणेश धावडे (वय २२, रा. उत्तमनगर) याने फिर्याद (गु. रजि. नं. १/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक शार्मा (वय २१), मंगेश ठाकूर (वय २३), गुण्या ऊर्फ निरज हिनोटिया (वय १९), सोहेल सय्यद (वय २२) यांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार प्रसाद दांगट, लड्डु परदेशी, झप्या ऊर्फ गौस परदेशी, निखील कंधारे, किशोर अडागळे, दाद्या सांळुखे यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केले असून मंगेश ठाकूर, किशोर अडगळे, गुण्या हिनोटिया हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहेत. हा प्रकार उत्तमनगरमधील मासेआळीत ३१ डिसेबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लघुशंकेसाठी थांबले असताना प्रसाद दांगट व लड्डु परदेशी तेथे आले. त्यांनी तू काय मोठा भाई झालास का असे म्हणून शिवीगाळ केली. त्यांच्यात वाद सुरु असतानाच इतर आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे पडलेली दगडे फेकून मारली. तेव्हा फिर्यादी हे आत्याचे घरी पळून गेले. त्यानंतर पुन्हा लाँड्रीच्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आले असता इतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

याविरोधात कार्तिक प्रसाद शर्मा (वय २१, रा. मासेआळी, उत्तमनगर) याने फिर्याद (गु. रजि. नं. २/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव धावडे (वय २२) आणि प्रसाद कोळी (वय २२, रा. उत्तमनगर) या गुन्हेगारांना अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर उभे असताना गौरव धावडे व प्रसाद कोळी तेथे आले.
तू काय मोठा भाई झालाय का, डोळे फाडून काय बघतोय, तुझ्या एरियात आलोय, काय वाकडी करणार,
असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. गौरव याने याला आज खल्लास करुन टाकू असे म्हणून
रस्त्यावरील फरशी उचलून ती फिर्यादीच्या डोक्यात मारली. प्रसाद याने उजव्या डोळ्यावर बुक्की मारुन जखमी केले.
पोलिसांनी दोन्ही टोळ्यांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Attempt To Kill Murder Uttam Nagar Police Station Arrest 7

 

हे देखील वाचा :

Nysa Devgan | काजोल-अजयच्या लेकीचा बोल्ड अंदाज, दुबईतील सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदने माफी मागत शेअर केले ट्विट

Pune Crime News | 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणारी माहिला समर्थ पोलिसांच्या जाळ्यात; 12 महागडे हॅन्डसेट जप्त

 

The post Pune Crime News | ‘मोठा भाई झालास का’? ‘थर्टी फस्ट’ला वर्चस्वातून 2 गुंडाच्या टोळ्यात राडा, उत्तमनगरमधील घटनेत 7 जणांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article