Header

Pune Crime News | मुंढव्यात महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

Pune Crime News | मुंढव्यात महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | बलात्काराची केस (Rape Case) मागे घ्यावी, यासाठी महिलेला धमकावुन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी रमजान खलील पटेल (वय ६०, रा. भिमनगर, मुंढवा) याच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत एका ३८ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१/२३) दिली आहे. हा प्रकार मुंढव्यातील भीमनगरमध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पतीपासून विभक्त रहात आहेत. कोर्टातील कामानिमित्त त्यांची लष्कर कोर्टात (Lashkar Court Pune) रमजान पटेल याच्याशी ओळख झाली. तो फिर्यादी यांना बार्शीला घेऊन गेला व तेथे त्याने फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. त्याबाबत त्यांनी २०१८ मध्ये पांगरी पोलीस ठाण्यात (Pangri Police Station) फिर्यादी दिली आहे. त्याची येत्या २३ जानेवारीला तारीख आहे.

रमजान पटेल हा आठ दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबासह फिर्यादी रहात असलेल्या इमारतीत रहायला आला.
बुधवारी सकाळी फिर्यादी या कचरा टाकण्यासाठी खाली आल्या असताना रमजान पटेल व त्याच्या मित्राने फिर्यादी यांना अडवले. तु माझ्याविरुद्ध बलात्काराची बार्शी कोर्टात (Barshi Court) केलेली केस पाठीमागे घे असे फिर्यादीला म्हणाला.तेव्हा तुला काय सांगायचे ते कोर्टात सांग असे त्यांनी सांगितले. त्यावर त्याने त्याच्याजवळील पिशवीतून बाटली काढून त्यातील रॉकेल फिर्यादीच्या अंगावर टाकले. त्यामुळे फिर्यादी यांच्या अंगाची आग होऊ लागल्याने त्यांनी तेथून पळून जाऊन स्वत:चा जीव वाचविला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक काकडे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime News | An attempt was made to set a woman on fire by throwing kerosene on her body in Mandhwa

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | दावोसमध्ये देखील मोदींचे भक्त; ‘मला म्हणाले तुम्ही…’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune PMC News | स्टँडींग कमिटीतील ‘माझे ते माझेच आणि तुमचे तेही माझेच’ यावरून यापुर्वीच्या कमिटी सदस्य व पदाधिकार्‍यांमध्ये १० महिन्यांनंतरही संघर्ष सुरूच

CM Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोक उपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

The post Pune Crime News | मुंढव्यात महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article