Header

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुना बाजार येथील दुकानांना बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत ८ ते १० दुकाने जळून भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. (Pune Fire News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

जुन्या बाजारात फर्निचर, लोखंडी साहित्य, दुचाकीचे सुटे भाग विक्री करणारी दुकाने आहेत. त्यातील एका दुकानात सकाळी साडेसात वाजता आग लागली. अग्निशमन दलाला सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी वर्दी मिळाली. तातडीने ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख विजय भिलारे आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

 

या आगीत लाकडी साहित्य, प्लास्टिक माल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.

 

Web Title :-  Pune Fire News | Fire to shops in old bazaar in Mangal Peth; 10 shops gutted in fire

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील सारसबागेत आढळली बेवारस बॅग, परिसरात प्रचंड खळबळ

Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर

 

The post Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article