Header

Pune Pimpri Crime News | ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात, 12 लाखांची फसवणूक; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pune Pimpri Crime News | ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात, 12 लाखांची फसवणूक; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Crime News | मोबाईलवरील ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने अ‍ॅपच्या माध्यमातून 12 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) 28 मार्च 2022 ते 26 जुलै 2022 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत अशिर्वाद मुकुंद उगे Ashirvad Mukund Uge (वय-38 रा. ब्लुमिंग डेल, रावत ता. हवेली) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 420, 406, आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल व्हॉटस्अपवर एका क्रमांकावरुन एस.एम.एस आला होता. यामध्ये डिव्हाईन काऊज अ‍ॅपची (Divine Cows App) माहिती दिली होती. त्यामध्ये शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करण्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी अ‍ॅपमध्ये 11 लाख 90 हजार रुपयांची गुंतवणूक केली. याचा फायदा झाल्याचे सर्व डिटेल्स अ‍ॅपमध्ये दिसत होते.
मात्र काही दिवसांनी डिव्हाईन काऊज अ‍ॅपमधून सर्व माहिती डिलीट झाली. त्यामध्ये काहीच बॅलन्स दिसला नाही.
त्यावेळी आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Investing in trading app turns out to be expensive, 12 lakh fraud; Incident in Pimpri Chinchwad

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | दारुड्या ड्रयव्हर पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार, लहानग्या मुलांमुळे वाचले आईचे प्राण; पुण्यातील घटना

Raj Thackeray | अभद्र बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच खडसावले; म्हणाले…

Pune Crime News | पोलिस संरक्षण प्राप्त असलेल्या बिल्डर संतोष पवारकडून एकावर गोळीबार; सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील घटना

 

The post Pune Pimpri Crime News | ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात, 12 लाखांची फसवणूक; पिंपरी चिंचवडमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article