Header

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन  दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) आचोळे पोलीस ठाण्यातील (Achole Police Station) दोन पोलीस हवालदारांना (Police Constables) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पोलीस हवालदार योगेश गोकुळ देवरे Yogesh Gokul Deore (वय 36), जितेंद्र मधुकर बनसोडे Jitendra Madhukar Bansode (वय-35) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.12) केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत 51 वर्षाच्या व्यक्तीने गुरुवारी ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांच्या विरुद्ध मिरा -भाईदर वसई विरार आयुक्तालयांतर्गत (Mira -Bhayandar Vasai under Virar Commissionerate) असलेल्या आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी पोलीस हवालदार योगेश देवरे व जितेंद्र बनसोडे यांनी 35 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

 

एसीबीच्या पथकाने गुरुवारी पडताळणी केली असता, दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लालेची मागणी करुन 20 हजार रुपये स्विकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदार योगेश देवरे
व जितेंद्र बनसोडे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande), अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
(Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार
(Deputy Superintendent of Police Madhavi Rajekumbhar), पोलीस अंमलदार खान, तारी, महिला पोलीस नाईक तेटांबे यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Thane ACB Trap | 2 police arrested by anti-corruption department while accepting bribe of 20 thousand

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला 12 वर्षाच्या मुलीने मारली लाथ; प्रसंगावधाने टळला अत्याचाराचा प्रकार

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्र वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

Success Story | नोकरी सोडून बनली ‘BSc चहावाली’, वडिलांनी तोडले नाते, इतक्या कमाईमुळे तुफान चर्चेत

 

The post Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article